सांगली मध्ये शेकडो कार्यकात्यांचा भाजप मध्ये प्रवेश :-


सांगली मध्ये शेकडो कार्यकात्यांचा भाजप मध्ये प्रवेश :-

जि. सांगली. ता.मिरज:दि. 1 जून :-भारतीय जनता पक्षाच्या वतीने मिरज येथील आळतेकर हॉलमध्ये पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम तसेच भाजपा सांगली शहर जिल्हा अंतर्गत विविध मोर्चांच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य निवडीचा सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करत पक्ष संघटनेला बळकटी दिली.

यावेळी माजी नगरसेविका स्वाती पारधी, अनिल आमटवणे, सन्मती गणे, डॉ.महेशकुमार कांबळे,सुमित कांबळे,दिगंबर जाधव,कुबेर गणे,श्रीकांत डोंगरे,सावित्री थोरवे,यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपस्थित नेत्यांनी संघटन विस्तार, बूथ सक्षमीकरण आणि केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, प्रदेश कार्यकारिणी सदस्या नीताताई केळकर, भाजपा नेत्या
जयश्रीताई पाटील, स्वातीताई शिंदे, संगीताताई खोत, मंजिरी गाडगीळ, बाळासाहेब आळतेकर, स्मिताताई भाटकर, तानाजी पाटील, जिल्हा परिषद गटनेते आशिष जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!