शासकीय कार्यालयात महिलेकडे शरीर सुखाची मागणी :नातेवाईक आक्रमक :-
सांगली:दि. 1 जून :-एसटी महामंडळाच्या सांगली विभागीय कार्यालयात एका वरिष्ठ लिपिकावर महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी करून मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी थेट कार्यालयात जाऊन संबंधित लिपिकाला मारहाण केली.
महिला कर्मचाऱ्याने गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या त्रासाबाबत कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार घडला. भर कार्यालयात झालेल्या या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, संबंधित कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वीही तक्रारी करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून, त्याच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा आणि कार्यस्थळी लैंगिक छळाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










