पुण्याची आरोही देशपांडे जेईई ॲडव्हान्स 2026 मध्ये मुलींमध्ये देशात प्रथम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन
पुणे : जेईई ॲडव्हान्स 2026 परीक्षेच्या निकालात पुण्याच्या आरोही देशपांडे हिने देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक मानल्या जाणाऱ्या या परीक्षेत मिळवलेल्या या घवघवीत यशामुळे राज्यभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून आरोहीचे विशेष कौतुक केले. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, “महाराष्ट्राची शान! जेईई ॲडव्हान्स 2026 परीक्षेत मुलींमध्ये अव्वल स्थान पटकावल्याबद्दल आरोही देशपांडे हिचे मनःपूर्वक अभिनंदन. तिचे अथक परिश्रम, समर्पण आणि बुद्धिमत्ता यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राला तिचा अभिमान वाटत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा!”
आरोहीच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडूनही तिचे कौतुक केले जात आहे. जेईई ॲडव्हान्ससारख्या प्रतिष्ठित परीक्षेत देशातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जाते.
आरोही देशपांडे हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवलेले हे यश महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
– उमेश कुलकर्णी
9822548429










