भारतीय जनता पक्ष पिंपरी–चिंचवड शहर आघाडी… ५ जूनला एक लाख वृक्षारोपणाचे नियोजन


भारतीय जनता पक्ष पिंपरी–चिंचवड शहर आघाडी… ५ जूनला एक लाख वृक्षारोपणाचे नियोजन

पिंपरी–चिंचवड, ४ जून २०२६ — मोदी सरकारच्या बारा वर्षे पूर्णत्वाच्या निमित्ताने आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, पिंपरी–चिंचवड शहराच्या वतीने ५ जून रोजी शहरात एक लाख वृक्षारोपण करण्याचे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या मोहिमेचे आयोजन भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या अभियानाचे जिल्हा संयोजक भाजपा जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे यांना नेमण्यात आले असून सहसंयोजक पदावर मनोज तोरडमल व रमेश वहिले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र संयोजक म्हणून खासदार प्रा. मेघाताई कुलकर्णी यांनाही प्रदेशाने जबाबदारी दिलेली आहे.
वृक्षारोपणाची सुरुवात ५ जून रोजी सकाळी ७ वाजता दुर्गा टेकडी येथून एक हजार वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे. संपूर्ण दिवसभरात चिंचवड, पिंपरी व भोसरी या तीनही विधानसभेतून १४ मंडळे ते बूथ स्तरापर्यंत विस्तीर्ण वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल.
या मोहिमेत शहराध्यक्ष व नगरसेवक शत्रुघ्न बापु काटे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर भाऊ जगताप, आमदार महेश दादा लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित जी गोरखे, महापौर रवी भाऊ लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, पक्षनेते प्रशांतजी शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी वैयक्तिकरीत्या वृक्षारोपण करणार किंवा प्रमुख म्हणून उपस्थित राहतील.
शहरातील सर्व मंडल अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, माजी नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ नेते, शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख व सर्व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते आपापल्या बूथवर आणि स्थानिक समाज संस्थांशी सहकार्याने वृक्षारोपण व जनसहभाग सुनिश्चित करतील. पहिल्याच दिवशी किमान १५,००० वृक्षारोपण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून पुढील पंधरा दिवसांत संपूर्ण शहरात एक लाखाहून अधिक वृक्षारोपण करण्याचे नियोजन केले आहे.
वृक्षारोपणाबरोबरच नदी स्वच्छता, प्लास्टिक विरोधातील जनजागृती आणि विविध ठिकाणी स्वच्छता अभियान देखील या मोहिमेचा भाग म्हणून राबवले जातील.
शहराध्यक्ष शत्रुघ्न बापु काटे व जिल्हा संयोजक मधुकर बच्चे यांनी पिंपरी–चिंचवड शहरातील नागरिकांना या अभियानात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे व वृक्षारोपण करून त्याची संगोपनही करण्याचे अनुरोध केले आहे

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!