विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर; प्रशासनाची धडक कारवाई


विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर बुलडोझर; प्रशासनाची धडक कारवाई


विषारी दारू प्रकरणात प्रशासनाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवला आहे. आरोपीने नियमांचे उल्लंघन करून उभारलेल्या घराचे पाडकाम करण्यात आले.
गुन्हेगारांवर वचक बसावा आणि बेकायदेशीर कृत्यांना आळा बसावा, या उद्देशाने प्रशासनाने ही धडक कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, अनेक नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान, विषारी दारू प्रकरणाचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!