पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन:-


पुण्यातील कथित विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई; ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन:-

पुणे:दि. 4 जून :-पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सुरू असलेल्या कथित विषारी दारू विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत ९ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. कर्तव्यातील हलगर्जीपणा, अवैध दारू विक्री रोखण्यात आलेले अपयश आणि देखरेखीतील त्रुटी यांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अमितेश कुमार यांनी हडपसर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांनी दापोडी पोलीस चौकीतील सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

प्राथमिक चौकशीत संबंधित भागात अवैध दारू विक्री सुरू असल्याची माहिती उपलब्ध असतानाही आवश्यक ती कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्यांवर पुढील प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता आहे. अवैध दारू विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

“अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अथवा अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.

या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाविरोधातील प्रशासनाच्या भूमिकेबाबत महत्त्वाचा संदेश गेला असून, संबंधित प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!