ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते जिल्ह्यात वृक्षा रोपण :-
सांगली :गार्डी:दि. 4 जून :-पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्यासाठी ट्री आर्मीच्या वतीने गार्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या ४००० वृक्षांच्या भव्य वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ विटा-खानापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुहास बाबर यांच्या माध्यमातून ज्येष्ठ अभिनेते व पर्यावरणप्रेमी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नांतून आयोजित या उपक्रमात पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. वृक्षसंवर्धनासाठी सातत्याने जनजागृती करणारे जॅकी श्रॉफ यांनी उपस्थितांना वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण लाभले.
या मोहिमेत नागरिक, स्वयंसेवक, युवक आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रत्येक लावलेले रोप हे पर्यावरण संरक्षण, शुद्ध हवा आणि भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेले अमूल्य योगदान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आमदार सुहास बाबर यांनी पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सर्वांनी पुढे येण्याचे आवाहन केले. समाजाच्या सक्रिय सहभागातूनच हरित आणि समृद्ध भविष्य घडवता येईल, असे त्यांनी नमूद केले.
गार्डी येथे झालेल्या या भव्य वृक्षारोपण उपक्रमामुळे हरित चळवळीला नवी ऊर्जा मिळाली असून, “आजचे रोपण म्हणजे उद्याच्या पिढ्यांसाठी जीवनदान” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे
9359280220.










