प्रदूषण टाळण्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे – डॉ. रोहित कुलकर्णी.


प्रदूषण टाळण्यासाठी एक झाड लावावे

टाकळीभान प्रतिनिधी – एकीकडे देश प्रगत होत असतांना दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची मोठी हानी होत असून प्रदूषणाचे वाढते प्रमाण ही आपल्याला धोक्याची घंटा आहे त्यामुळे आपण वेळीच सावध झालो नाही तर येणारी पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही असे प्रतिपादन कारेगाव येथील डॉक्टर रोहित कुलकर्णी यांनी केले. लेट एकनाथ नामदेव गटकळ इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. भाऊसाहेब टेमक व अॅड. सुरेखा
टेमक यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉ. रोहित कुलकर्णी अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी शाळेच्या प्राचार्या कुदळे यांनी आपल्या भाषणातून पर्यावरण दिनानिमित्त माहिती सांगितली, यावेळी प्रमुख पाहुणे व पालकांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी स्वरा बोरुडे हिने केले तर आभार प्रदर्शन वर्षा मगर यांनी मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!