भाजप आणि आयटी सेलवालेच भारतीय, बाकी पाकिस्तानी आहेत का? – अभिजित दीपके यांचा सवाल.


भाजप आणि आयटी सेलवालेच भारतीय, बाकी पाकिस्तानी आहेत का? – अभिजित दीपके यांचा सवाल


छत्रपती संभाजीनगर, ता. ७ (प्रतिनिधी) – काँक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी भाजप आणि त्यांच्या आयटी सेलच्या कार्यपद्धतीवर टीका करत देशातील तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या आंदोलनानंतर छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दीपके म्हणाले की, देशातील तरुणांना रोजगार, दर्जेदार शिक्षण आणि भविष्यासंदर्भातील संधींची गरज आहे. मात्र समाजात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून मूळ प्रश्नांपासून लोकांचे लक्ष विचलित केले जात आहे. “हिंदू-मुस्लिम करून नोकऱ्या मिळत नाहीत. तरुणांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
दिल्लीतील आंदोलनाचा उद्देश विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हा असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षा, रोजगार निर्मिती आणि युवकांना समान संधी या विषयांवर ठोस धोरणे राबविण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी भाजप आणि आयटी सेलवर टीका करत, “भाजप आणि आयटी सेलवालेच भारतीय आहेत आणि बाकी सर्व पाकिस्तानी आहेत का?” असा सवाल उपस्थित केला. देशातील युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची वेळ आली असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा रोजगार आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
“आमचा लढा तरुणांच्या भविष्यासाठी आहे. आम्हाला फक्त नोकऱ्या, चांगले शिक्षण आणि समान संधी हव्या आहेत. समाजात तेढ निर्माण करून कोणाचाही फायदा होत नाही. युवकांच्या प्रश्नांवर तोडगा निघालाच पाहिजे,” असे अभिजित दीपके यांनी स्पष्ट केले.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!