बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण मोरेश्वर कुलकर्णी यांचा ६१ वा वाढदिवस उत्साहात साजरा; नातेवाईक व मित्रमंडळींची मोठी उपस्थिती
पुणे : बाळकृष्ण मोरेश्वर कुलकर्णी यांनी वयाची ६० वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण करून ६१ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांच्या वाढदिवसाचा सोहळा अत्यंत उत्साहात आणि कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे औचित्य साधून स्नेहभोजन व कौटुंबिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सोहळ्याला कुलकर्णी, कुगावकर, अकोलकर, साने, बिबीकर, देशपांडे, पराडेकर, इनामदार परिवार इतर नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. विशेष म्हणजे काही मित्रमंडळी या कार्यक्रमासाठी बारामतीहून खास पुणे येथे आले होते.
कार्यक्रमादरम्यान अनेक नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रांनी आपल्या मनोगतातून बाळकृष्ण मोरेश्वर कुलकर्णी यांच्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक आणि मित्रत्वाच्या नात्यांतील जिव्हाळ्याच्या प्रसंगांचा उल्लेख करत उपस्थितांनी त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित नातेवाईक, मित्रमंडळी आणि आप्तेष्टांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन बाळकृष्ण मोरेश्वर कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच वाढदिवसानिमित्त त्यांची तुळा करण्यात आली सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
संपूर्ण कार्यक्रम आनंद, आपुलकी आणि स्नेहाच्या वातावरणात पार पडला. उपस्थित सर्वांचे आभार मानताना बाळकृष्ण मोरेश्वर कुलकर्णी यांनी हा प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि स्नेहाचा बंध भविष्यातही असाच कायम राहावा, अशी भावना व्यक्त केली.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









