पंतप्रधान यांच्या आवाहनाला भाजपा नेत्यांचा प्रतिसाद :-


पंतप्रधान यांच्या आवाहनाला भाजपा नेत्यांचा प्रतिसाद :-

सांगली:दि. 8 जून :-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजपच्या नेत्यांनी सांगली जिल्ह्यातील प्रचारदौऱ्यात

सांगली ते जत आणि जत ते विटा या प्रचारदौऱ्यादरम्यान राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकाच वाहनातून प्रवास केला. इंधनबचतीसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

या एकत्र प्रवासादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, संघटनात्मक विषय, विविध विकासकामे तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अपेक्षा, गरजा आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा केल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधनबचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत छोटासा का होईना,भावना व्यक्त केल्या.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!