कोकणातील कलाकार व चित्रपटसृष्टीसाठी विशेष आवाहन :-
जि. रत्नागिरी :दि. 9 जून :-अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले तसेच भविष्यातील पदाधिकारी यांचा सन्मान करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, संगीत क्षेत्रातील मान्यवर व चित्रपटप्रेमी यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्याचा मानस आहे.
या माध्यमातून कोकणातील चित्रपटसृष्टी, कलाकार, तंत्रज्ञ, संगीत क्षेत्र व इतर संबंधित घटकांच्या विकासासाठी सकारात्मक संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळामध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या कलाकारांनी तसेच कोकण विभागातील चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी आपल्या अपेक्षा, सूचना किंवा समस्या मांडू इच्छिणाऱ्या सर्वांनी आपल्या सूचना खालील क्रमांकावर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोकणातील चित्रपटसृष्टी अधिक सक्षम व समृद्ध करण्याचा संकल्प आहे.
📞 संपर्क:
प्रविण किणे
अ वर्ग सभासद (दिग्दर्शक विभाग)
निर्माता व निर्मिती संस्था अ वर्ग सदस्य
मो. नं.: 7030166666.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










