आलेगाव-सावरगाव परिसरासाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू; निलेश कापकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद:-
जि. अकोला :दि. 9 जून :-आलेगाव, सावरगाव आणि परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांच्या वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन Dr. राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवत या सेवेचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना व विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सेवा हीच आमची ओळख, आमचं कामच बोलतंय” या भावनेतून निलेश कापकर यांनी जनतेसाठी विविध लोकोपयोगी उपक्रमांची मालिका सुरू केली आहे. ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना उपचारासाठी शहरात जाण्यात अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेली मोफत रुग्णवाहिका सेवा नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यासोबतच परिसरातील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेऊन मोफत पाणीपुरवठा टँकर सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
प्रत्येक गाव तिथे अभ्यासिका’ उपक्रमाची घोषणा
शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण पाऊल उचलत निलेश कापकर यांनी लवकरच Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने २४ तास सुरू राहणाऱ्या अभ्यासिका गावागावांत सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. “प्रत्येक गाव तिथे अभ्यासिका” या संकल्पनेतून ग्रामीण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष
रस्ते, वीज, पाणी, शेती, आरोग्य आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसाठी निलेश कापकर यांनी अनेक आंदोलने आणि पाठपुरावे केले आहेत. शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष करून अनेक प्रश्न मार्गी लावल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या कार्यक्रमास नारायण गव्हाणकर , चंद्रशेखर पांडे , रेखा राऊत , विठ्ठल सर्प , प्रणव तायडे , उमेश भुसारी , शंतनू पाटील , प्रकाश गिते , सुनील आवटे यांच्यासह विविध पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मोफत रुग्णवाहिका सेवा, पाणीपुरवठा टँकर आणि आगामी शैक्षणिक उपक्रमांमुळे परिसरात निलेश कापकर यांच्या सामाजिक कार्याची चर्चा होत असून, जनहिताच्या कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास आणि आपुलकी वाढत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.










