महाराष्ट्राचे दादा’ पुस्तकात सम्राट समाधान हनुमान यांच्या कवितेचा समावेश; ठाकर आडगाव येथे सत्कार:-


महाराष्ट्राचे दादा’ पुस्तकात सम्राट समाधान हनुमान यांच्या कवितेचा समावेश; ठाकर आडगाव येथे सत्कार:-

जि.बीड.ता.गेवराई :-दि. 9 जून :-ईश्वरी प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्राचे दादा’ या पुस्तकात कवी सम्राट समाधान हनुमान यांच्या कवितेचा समावेश झाल्याबद्दल ठाकर आडगाव येथे त्यांचा छोटेखानी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्य, व्यक्तिमत्त्व आणि आठवणींवर आधारित ‘महाराष्ट्राचे दादा’ हे पुस्तक ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये राज्यातील विविध भागांतील २५ लेखकांचे लेख, अनुभव आणि कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. पुस्तकाचे संपादन ज्येष्ठ पत्रकार संतोष धायबर यांनी केले आहे.

अलीकडेच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना लेखिका सुवर्णा निंबाळकर आणि संपादक संतोष धायबर यांनी ‘महाराष्ट्राचे दादा’ हे पुस्तक भेट दिले. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर राज्यभरातील लेखक आणि साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकर आडगाव येथे आयोजित सत्कार समारंभात कवी सम्राट समाधान हनुमान यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिंबक कोकाटे (बाबुभाऊ कोकाट) होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सचिन डोंगरे , लाड गुरुजी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘लेखणीचा अभिमान, गावकऱ्यांची शान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कवी सम्राट समाधान हनुमान यांचे अभिनंदन करत त्यांच्या साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना कवी सम्राट समाधान हनुमान यांनी सांगितले की, ‘महाराष्ट्राचे दादा’ या महत्त्वपूर्ण पुस्तकात आपली कविता प्रकाशित होणे हा अभिमानाचा क्षण असून, हे यश गावकऱ्यांचे प्रेम, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळेच शक्य झाले आहे. त्यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

साहित्य, समाजकारण आणि नेतृत्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या या पुस्तकामुळे नवोदित लेखक आणि कवींना प्रेरणा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!