कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा :-
सांगली :दि. 10 जून :-सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत विनापरवाना दीर्घकाळ गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आयुक्त संजिता महापात्र यांनी मोठी कारवाई करत तब्बल ३७ कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे महापालिका कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये काही राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा असून, शिंदे सेनेच्या शहरप्रमुखाचे नाव सफाई कर्मचारी यादीत असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक कर्मचारी महापालिकेत मानधन तत्त्वावर सफाई कर्मचारी म्हणून नोंद असताना प्रत्यक्षात इतर ठिकाणी, अगदी पुण्यात काम करत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे.
आयुक्त महापात्र यांनी सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता आणि रजा मंजूर नसताना सलग ९० दिवसांहून अधिक काळ गैरहजर राहिलेल्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली. याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, पुढे बडतर्फीची कारवाईही प्रस्तावित करण्यात येणार आहे.
कामचुकारपणा आणि शिस्तभंग सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत आयुक्तांनी भविष्यातही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील, असा इशारा दिला आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.







