कुंभार समाजाला वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत; राज्य सरकारचा मोठा निर्णय, शासन निर्णय जारी


कुंभार समाजाला वर्षभरात ७०० ब्रास माती मोफत; राज्य सरकारचा मोठा निर्णय, शासन निर्णय जारी

​मुंबई (दि. १२ जून):
पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने कुंभार समाजासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. कुंभार समाजातील कारागिरांना त्यांच्या व्यवसायासाठी वर्षभरात तब्बल ७०० ब्रासपर्यंत माती आणि राख मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) देखील जारी करण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
​या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना विशेष ओळखपत्रे दिली जाणार आहेत. ही मोफत माती गावातील तलाव, नदीपात्र तसेच सरकारी जमिनींमधून उपलब्ध करून दिली जाईल. या निर्णयामुळे कुंभार समाजाच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर न्याय मिळाल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे.
​दरम्यान, हा निर्णय अमरावती निवडणुकीतील दबावामुळे घाईघाईने घेण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून होत होते. मात्र, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हा निर्णय केवळ पारंपरिक व्यवसायाला आणि कारागिरांना बळ देण्यासाठीच घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!