एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ; आता ५८ टक्के ‘डीए’ मिळणार
मुंबई (दि. १२ जून):
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के अशी ५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली.
या वाढीसोबतच एसटी कर्मचाऱ्यांची घरभाडे भत्त्याची तब्बल १०० कोटी रुपयांची थकबाकी देखील दिली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 59










