सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या:-


सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या:-

जि. छ. संभाजीनगर:ता. कन्नड:दि. 11 जून :-कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथे अवघ्या दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या मयुरी सचिन खरे (वय 22) या नवविवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयुरी हिचा विवाह 7 नोव्हेंबर 2024 रोजी झाला होता. विवाहानंतर पती सचिन, सासू-सासरे यांनी हुंडा न दिल्याच्या कारणावरून मानसिक व शारीरिक छळ सुरू केल्याचा आरोप तिच्या माहेरकडील नातेवाईकांनी केला आहे.

तक्रारीनुसार, “लग्न साध्या पद्धतीने केले, हुंडा दिला नाही” असे म्हणत तिला सातत्याने त्रास दिला जात होता. तसेच मुलगी झाल्यानंतर हा त्रास अधिक वाढल्याचेही सांगण्यात आले आहे. सोन्याची अंगठी व पैसे आणण्याची मागणी करून छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या सततच्या त्रासाला कंटाळून मयुरीने घरातील छताच्या लोखंडी हुकाला दोरी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक नारायण गीते, कैलास करवंदे, अजय मोतीगे, दिलावर वासावे व नासीर शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून वैद्यकीय अधिकारी डॉ. राम पुंगळे यांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर माहेरच्या चिंचखेड़ा गावात शोककळा पसरली असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मयुरीच्या मागे सहा महिन्यांची लहान मुलगी असल्याने ही घटना अधिकच हृदयद्रावक ठरली आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!