सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी पुण्यात विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन; गृहनिर्माण महासंघ आणि लिपॉट टेक्नॉलॉजिजचा पुढाकार
पुणे: सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्सचे व्यवस्थापन अधिक सुलभ, पारदर्शक आणि कायदेशीर नियमांनुसार व्हावे या उद्देशाने एका विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघ मर्या. आणि लिपॉट टेक्नॉलॉजिज, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या एकदिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, समिती सदस्य आणि सर्वसामान्य सभासदांना विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने गृहनिर्माण संस्थेचे दैनंदिन व्यवस्थापन, थकबाकी वसुलीच्या कायदेशीर पद्धती, सभा व्यवस्थापन, ऑडिट, टॅक्सेशन (कर आकारणी) आणि पर्यावरणपूरक ‘ग्रीन सोसायटी’ यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश असणार आहे.
हा प्रशिक्षण कार्यक्रम रविवार, १४ जून २०२६ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत ‘लिपॉट टेक्नॉलॉजिज, ऑफिस नं. ८०८, सी-टॉवर, गेराज इम्पेरियम गेटवे, नाशिक फाटा मेट्रो स्टेशन, कासारवाडी, पिंपरी-चिंचवड, पुणे’ येथे पार पडणार आहे.
कार्यक्रमासाठी मर्यादित जागा उपलब्ध असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी श्री. अभिजित कुलकर्णी (88888 72345) किंवा डॉ. महेंद्र सेठी (70385 85222) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429




