देवदर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला :-
जि.सातारा:ता. माण:दि. 14 जून :-म्हसवड येथील श्री सिद्धनाथांच्या दर्शनाहून परतत असताना तांदुळवाडी परिसरात एक खाजगी पिकअप वाहन विहिरीत कोसळून ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
सातारा जिल्ह्यातील सिद्धिनाथ हे जागृत देवस्थान म्हणून मानले जाते, येथे दर वर्षी सिद्धनाथचा उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो.
प्रत्येक वर्षी राज्यातून व राज्याच्या बाहेरून लाखो भाविक सिद्धानाथच्या दर्शनाला येत असतात. आशाताच काल एक दुर्दैवी घटना घडली,भाविकांना घेऊन जाणारे पिकअप वाहन चालकाचा ताबा सुटल्याने विहिरीत कोसळले.
नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि सुदैवाने ७ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
जखमीना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात भरती करण्यात आले आसून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.










