पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास ५०० रुपयांचा दंड; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा कडक निर्णय


पुणे विमानतळावर १५ मिनिटांपेक्षा जास्त थांबल्यास ५०० रुपयांचा दंड;
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा कडक निर्णय

पुणे — वाढती वाहतूक कोंडी आणि विमानतळ


परिसरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुणे विमानतळ प्रशासनाने ठोस पाउल उचलले आहे. नव्या नियमांनुसार प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या खाजगी वाहनांना टर्मिनल परिसरात केवळ १५ मिनिटे थांबण्यास परवानगी असेल. यापेक्षा जास्त वेळ वाहन थांबले तर संबंधित वाहनचालकावर ५०० रुपयांचा दंड लागू केला जाईल.
प्रशासनाने सांगितले की हा नियम दिल्ली मुख्यालयाची मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच अमलात आणला जाईल. विमानतळावर वाहतुकीचे अतिक्रमण आणि अशा ठिकाणी बेशिस्तपणे पार्किंग केल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता; या नव्या निर्बंधामुळे कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा दर्शवण्यात आली आहे.
प्रशासन पुढील काळात या नियमाची अंमलबजावणी कशी होईल, तिकीट तपास व प्रवेश नियंत्रणासाठी कोणती व्यवस्था ठेवली जाईल आणि वैद्यकीय किंवा अपघाती परिस्थितींमधील अपवाद कस. हाताळले जातील याबाबत अधिक माहिती देईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!