‘छावा’ चित्रपटातील अभिनेत्री संचिता उगलेचे निधन; पोलिसांकडून तपास वेगात


नालासोपारा : मराठी अभिनेत्री संचिता उगले हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर पोलिस तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. तसेच संचिताच्या वडिलांनी सध्या कोणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘छावा’ चित्रपटात ताराबाईंची भूमिका साकारून संचिताने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. तिच्या आकस्मिक निधनाने मराठी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असून कुटुंबीय आणि संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णीमो. ९८२२५४८४२९


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!