स्थानिक प्राधिकरण निवडणुकीत विक्रमी मतदान :-


स्थानिक प्राधिकरण निवडणुकीत विक्रमी मतदान :-

सांगली, दि. १८ : सांगली-सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक २०२६ साठी गुरुवारी (१८ जून) उत्साहात मतदान पार पडले. या निवडणुकीत तब्बल ९९.८९ टक्के विक्रमी मतदान झाल्याने निवडणुकीबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी मोठा उत्साह दाखविल्याचे स्पष्ट झाले.

सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७, अशा एकूण १२ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली.

आता सर्वांचे लक्ष सोमवार, २२ जून २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले असून, सकाळी ८ वाजल्यापासून तरुण भारत व्यायाम मंडळ इमारत, सांगली येथे मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निकालातून विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!