अंबरनाथमध्ये स्मार्ट मीटरविरोधात तीव्र आंदोलन; उद्योगपती अदानींची काढली प्रतीकात्मक तिरडी
अंबरनाथ: राज्यभरात महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीविरोधात नागरिकांचा आणि विविध संघटनांचा रोष वाढत चालला आहे. अंबरनाथ येथे आज याविरोधात एक तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी थेट उद्योगपती अदानी यांची प्रतीकात्मक तिरडी काढून महावितरण आणि प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड वाद झाला. त्यामुळे काही काळ परिसरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याची भीती सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. हा निर्णय शासनाने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनामुळे अंबरनाथमधील वातावरण काही काळ कमालीचे तापले होते.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








