सोनगावचा प्राजक्त अंत्रे सीईटी परीक्षेत विद्यालयात द्वीतीय क्रमांकाने उत्तीर्ण


सोनगावचा प्राजक्त अंत्रे सीईटी परीक्षेत विद्यालयात द्वीतीय क्रमांकाने उत्तीर्ण

टाकळीभान (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील नानासाहेब सहादु कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीतील विद्यार्थी प्राजक्त प्रविणकुमार अंत्रे याने नुकत्याच झालेल्या एमएच-सीईटी परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत विद्यालयात द्वितीय तर वर्गात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

 

सोनगाव-धामोरी येथील शेतकरी कुटूंबातील प्रविणकुमार भागवतराव अंत्रे यांचे चिरंजी व प्राजक्त प्रविणकुमार अंत्रे हा सात्रळ येथील नानासाहेब सहादु कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता बारावीत शिकत आहे. बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर झालेल्या स्पर्धा परीक्षेतील एमएच-सीईटी परीक्षेत 96 टक्के मिळवत विद्यालयात द्वितीय तर वर्गात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनिय कामगीरी बजावली.

 

प्राजक्त अंत्रे याने मिळविलेल्या यशामागे विद्यालयाचे प्राचार्य सिताराम गायकर, पर्यवेक्षीका हेमलता साबळे, विभाग प्रमुख व्ही बी दिघे, वर्गशिक्षीका सरीता मोकाटे, कॉम्प्युटर सायन्यचे चांगदेव वाडेकर, कविता कडू पाटील, संजय दिघे, किशोर हापसे, अजीत कंकराळे, सविता पवार व राहुल देशमुख आदिंचे मार्गदर्शन लाभले.

 

त्याचे या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरूण पाटील कडू, जनरल बॉडी सदस्य किरण पाटील कडू, संगमनेर येथील लायन्स क्लब सॅफ्रॉन सफायरचे अध्यक्ष अतुल अभंग, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, राजेंद्र देसाई, अशोकराव रणवरे,सोनगावचे सरपंच सौ. अलकाताई शिंदे, उपसरपंच एजाजभाई तांबोळी, खोकरचे माजी सरपंच उत्तमराव पुंड आदिंसह विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

 

गुरूजनांनी दिलेल्या योग्य दिशा, अभ्यासाचे नियोजन आणि वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याला हे यश प्राप्त करता आले. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या बळावर प्राजक्त अंत्रे याने ही यशस्वी कामगिरी बजाविली आहे. स्पर्धात्मक परीक्षेत मिळालेल्या या यशामुळे त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस नवे दालन खुले झाले आहे. सोनगाव येथील स्व. अड भागवतराव अंत्रे व श्रीरामूपर तालुक्यातील भोकर येथील पत्रकार चंद्रकांत झुरंगे यांचा तो नातू आहे.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!