नीट-युजी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज, कडेकोट बंदोबस्त :-
सांगली:21 जून :-जिल्ह्यात 21 जून रोजी होणारी नीट-यूजी फेरपरीक्षा 2026 सुरळीत, सुरक्षित, कॉपीमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रांवर 4,572 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सर्व संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देत, कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचे निर्देश दिले. परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त, उमेदवारांची सखोल तपासणी, प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिकांची सुरक्षित हाताळणी तसेच वाहतूक, वीज आणि आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी परीक्षा केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियंत्रणाची माहिती दिली. परीक्षार्थींनी प्रवेशपत्र व वैध ओळखपत्रासह वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.






