सेलिब्रिटी करू शकणार म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्सची जाहिरात; सेबीचा नवा प्रस्ताव


सेलिब्रिटी करू शकणार म्युच्युअल फंड आणि स्टॉक ब्रोकर्सची जाहिरात; सेबीचा नवा प्रस्ताव

मुंबई : भांडवली बाजार नियामक संस्था भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) ने जाहिरातींसंदर्भात एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार म्युच्युअल फंड कंपन्या, स्टॉक ब्रोकर्स आणि इतर वित्तीय सेवा पुरवठादारांना ठरावीक नियमांच्या अधीन राहून सेलिब्रिटींच्या माध्यमातून जाहिरात करण्याची परवानगी मिळू शकते.
सेबीने यासाठी एक समान जाहिरात आचारसंहिता (Common Advertising Code) प्रस्तावित केली असून, त्यामध्ये ‘सेलिब्रिटी’ या संज्ञेची व्याख्या अधिक व्यापक करण्यात आली आहे. प्रस्तावित नियमांनुसार खेळाडू, दूरदर्शन निवेदक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच मानवासारखे दिसणारे आभासी अवतार (Virtual Avatars) यांचाही सेलिब्रिटी म्हणून समावेश केला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ५ लाखांहून अधिक फॉलोअर्स किंवा सबस्क्राइबर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर्सनाही या व्याख्येत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे डिजिटल माध्यमांतील प्रभावशाली व्यक्तींना वित्तीय उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये सहभागी होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.
मात्र, गुंतवणूकदारांची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेण्यासाठी जाहिरातींमध्ये जोखीमविषयक सूचना, पारदर्शकता आणि नियामक नियमांचे पालन अनिवार्य राहणार असल्याचे सेबीने स्पष्ट केले आहे. या प्रस्तावावर संबंधित घटकांकडून अभिप्राय मागविण्यात आले असून, त्यानंतर अंतिम नियम जाहीर केले जाणार आहेत.

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!