वागळे इस्टेटमध्ये भीषण अपघात; गर्भवती महिलेसह तिघे जखमी


वागळे इस्टेटमध्ये भीषण अपघात; गर्भवती महिलेसह तिघे जखमी

ठाणे, दि. २६ : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रोड क्रमांक १६ येथे गुरुवारी (२५ जून) सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास भरधाव डंपरने रिक्षाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षामधील गर्भवती महिलेसह तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपरच्या जोरदार धडकेनंतर गर्भवती महिलेला रक्तस्राव सुरू झाला. तसेच रिक्षातील अन्य एका प्रवाशाला धक्क्यामुळे मानसिक तणावाचा सामना करावा लागला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वागळे इस्टेट पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!