मराठी उच्चारांच्या चुकीबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची सभागृहात दिलगिरी
मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात शोकप्रस्तावाचे वाचन करताना झालेल्या मराठी उच्चारांच्या आणि काही तथ्यात्मक चुकांबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, शोकप्रस्तावाची प्रत अत्यंत अस्पष्ट, लहान फॉन्टमध्ये आणि काही तांत्रिक त्रुटींनी युक्त होती. त्यामुळे वाचन करताना नकळत चुका झाल्या. कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याबद्दल अवमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी सभागृहात सांगितले.
ते पुढे म्हणाले की, सभागृहाचे कामकाज आपण मराठीतूनच चालवतो आणि मराठी भाषेचा आपल्यालाही तितकाच अभिमान आहे. या घटनेनंतर त्यांच्या मराठी उच्चारांवरून विरोधकांसह विविध स्तरांतून टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त करत या वादावर स्पष्टीकरण दिले.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429






