अदाणी समूहाच्या कंपनीला पत्र पाठवणे पडले महागात; पालघर महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगले निलंबित


अदाणी समूहाच्या कंपनीला पत्र पाठवणे पडले महागात; पालघर महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगले निलंबित

​पालघर:वरिष्ठ अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बाहेरील खाजगी कंपनीशी थेट संपर्क साधणे आणि शासनाच्या धोरणाविरोधात भूमिका घेणे पालघर मंडळाचे महावितरणचे अधीक्षक अभियंता मदन सांगले यांना चांगलेच महागात पडले आहे. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन आणि शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची थेट कारवाई करण्यात आली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, मदन सांगले यांनी अदाणी समूहाच्या कंपनीला एक पत्र पाठवले होते. या पत्रामध्ये, जर जनतेमध्ये रोष किंवा आंदोलन निर्माण झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कंपनीची असेल, असा उल्लेख करण्यात आला होता.
​मात्र, वरिष्ठ पातळीवर कोणतीही परवानगी न घेता अशा प्रकारे थेट खाजगी कंपनीशी संपर्क साधणे आणि शासकीय धोरणाशी विसंगत भूमिका घेणे हा गंभीर प्रशासकीय नियमांचा भंग मानला गेला आहे. याच शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग म्हणून महावितरण प्रशासनाने सांगले यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे महावितरण वर्तुळात आणि वीज विभागात एकच खळबळ उडाली आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!