ACB ने सील केलेल्या अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी; जळगावात दोन नातेवाईकांना रंगेहाथ अटक


ACB ने सील केलेल्या अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी; जळगावात दोन नातेवाईकांना रंगेहाथ अटक

जळगाव : अकोल्यातील लाचखोरी प्रकरणात अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांचे जळगाव येथील निवासस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सील केले होते. या सील केलेल्या घरात शिडी लावून बेकायदेशीरपणे प्रवेश करणाऱ्या प्रसाद नारखेडे आणि प्रवीण महाजन या दोघा नातेवाईकांना पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बंद असलेल्या घरातून संशयास्पद हालचाली आणि आवाज येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात किरण चौधरी यांच्या घरातील हिशोबाची डायरी तसेच इतर महत्त्वाचा मुद्देमाल नष्ट किंवा गायब करण्याच्या उद्देशाने ही घुसखोरी करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!