सातारा ​शिरसवडी येथील छावा गल्लीत रस्त्यांची दयनीय अवस्था; साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात


सातारा ​शिरसवडी येथील छावा गल्लीत रस्त्यांची दयनीय अवस्था; साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सातारा : ​शिरसवडी येथील छावा गल्लीतील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
​सध्या छावा गल्लीतील रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे आणि सांडपाणी साचून राहिले आहे, या साचलेल्या संथ पाण्यामुळे परिसरात डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत असून, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया यांसारख्या धोकादायक आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
​या चिखलमय आणि पाण्याने भरलेल्या रस्त्यामुळे गल्लीतून येण्या-जाण्यास नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनचालक घसरून पडण्याचे प्रकार घडत असून पादचाऱ्यांनाही चालणे कठीण झाले आहे. या समस्येबाबत स्थानिक ग्रामस्थांनी मा. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना करून रस्त्याची दुरुस्ती करावी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

पत्रकार जीवन इंगळे


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!