नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज निकाल; आरोपीला फाशी की जन्मठेप? राज्याचे लक्ष न्यायालयाकडे.


नसरापूर बालिका अत्याचार-हत्या प्रकरणाचा आज निकाल; आरोपीला फाशी की जन्मठेप? राज्याचे लक्ष न्यायालयाकडे.

पुणे, ता. २९ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपी भीमराव कांबळे (वय ६५) याला आज (सोमवार, ता. २९) शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने गुरुवारी (दि. २५) कांबळेला दोषी ठरवले होते. त्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा होणार की जन्मठेप, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नसरापूर येथील या अत्यंत संवेदनशील आणि संतापजनक प्रकरणाने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायालयात जलदगतीने करण्यात आली.

विशेष म्हणजे, गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकालाच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील इतक्या कमी कालावधीत सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागणारा हा राज्यातील पहिलाच खटला ठरण्याची शक्यता आहे.

आज न्यायालयाकडून सुनावण्यात येणाऱ्या शिक्षेकडे पीडित कुटुंबीयांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून, या प्रकरणात कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या गाजलेल्या प्रकरणावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे .


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!