पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे RSS बद्दल सूचक वक्तव्य :-


पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे RSS बद्दल सूचक वक्तव्य :-

सांगली:दी. 28 जून :-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संघाची ठाम बाजू मांडली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशद्रोही नव्हे, तर देशप्रेम आणि शिस्तीचे संस्कार देणारी संघटना असल्याचे त्यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृभूमीला आई मानणारी संघटना आहे. आम्ही स्वयंसेवक आहोत, शाखेत जातो, संचलनात सहभागी होतो. त्यात चुकीचे काय आहे?”

यावेळी त्यांनी विश्वास नांगरे-पाटील यांच्याबाबतही भूमिका मांडत, “विश्वास नांगरे-पाटील यांनी संघाच्या कार्यक्रमात जाण्यात काहीही गैर नाही. त्यांनाही मी संघ शाखेत जाण्याचा सल्ला देईन. तेथे शिस्त आणि संस्कार मिळतात,” असे वक्तव्य केले.

तसेच, संघावर टीका करणाऱ्यांनाही उद्देशून त्यांनी, “राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत गेल्यास तेथेही चांगले संस्कार मिळतात,” असे मत व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!