नरसापूर अत्याचार व हत्या प्रकरण: आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा; पुणे विशेष न्यायालयाचा निकाल
पुणे: भोर तालुक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला पुणे विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
१ मे २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर सादर केले. या पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429
Views: 111









