राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. किशोर देशपांडे यांची नियुक्ती


राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. किशोर देशपांडे यांची नियुक्ती

कळवण : सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रहिताच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे नाशिक येथील ज्येष्ठ समाजसेवक व जनसंपर्क क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व डॉ. किशोर देशपांडे यांची ब्रह्मराष्ट्र एकम विश्व महासंघ न्यास, श्रीकुल पीठ यांच्या “धर्मार्थ कार्य एवं जनसंपर्क प्रकोष्ठ”च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ब्रह्मराष्ट्र एकम विश्व महासंघाचे पीठाधीश व राष्ट्रीय अध्यक्ष परमपूज्य श्री १००८ डॉ. सचिन नाथजी महाराज यांनी डॉ. देशपांडे यांना मनोनयन व शुभाशीर्वाद पत्र प्रदान करून ही जबाबदारी सोपवली. समाजसेवा, संघटन कौशल्य, राष्ट्रप्रेम आणि सनातन संस्कृतीच्या जतनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ब्रह्मराष्ट्र एकम विश्व महासंघ ही संस्था राष्ट्रसेवा, संस्कृती संवर्धन, आध्यात्मिक जागृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी विविध उपक्रम राबवत असून समाजात धर्म, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी कार्यरत आहे.
डॉ. देशपांडे यांच्याकडे धर्मार्थ कार्य व जनसंपर्क प्रकोष्ठाची धुरा सोपविण्यामागे समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे आणि संस्थेचे कार्य अधिक व्यापक स्तरावर पोहोचविणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेला मिळणार असून ग्रामीण भागातील युवक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
डॉ. देशपांडे यांची ही नियुक्ती समाजहित, संस्कृती संवर्धन आणि जनजागृतीच्या कार्याला अधिक बळ देणारी ठरेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!