मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात धावत्या कारवर दगड कोसळले; विंडशील्ड फुटले, चालक थोडक्यात बचावला


मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात धावत्या कारवर दगड कोसळले; विंडशील्ड फुटले, चालक थोडक्यात बचावला

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बोगद्यात धावत्या कारवर छतावरील दोन मोठे दगड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत कारच्या समोरील विंडशील्डचा चुराडा झाला, मात्र चालक सुदैवाने थोडक्यात बचावला. त्यामुळे बोगद्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने जाणारी कार ‘मिसिंग लिंक’ बोगद्यातून जात असताना अचानक छतावरील दोन मोठे दगड थेट कारच्या समोरील काचेवर कोसळले. जोरदार धडकेमुळे विंडशील्ड फुटून काचेचे तुकडे चालकाच्या अंगावर आणि संपूर्ण गाडीत विखुरले.
सुदैवाने या घटनेत कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन सुरक्षितपणे थांबविल्याने मोठी दुर्घटना टळली.
मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या बोगद्यात घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस व संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकाराचा तपास सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822545429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!