पालघरमध्ये कुत्रे आडवे आल्याने भीषण अपघात; विरारच्या २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू, आई-बहिण गंभीर जखमी


पालघरमध्ये कुत्रे आडवे आल्याने भीषण अपघात; विरारच्या २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू, आई-बहिण गंभीर जखमी

पालघर :शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन विरारकडे परतणाऱ्या भानत कुटुंबाच्या कारचा पालघर जिल्ह्यातील विक्रमगड-मनोर मार्गावरील जांभा फरशी परिसरात भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाझुडुपात जाऊन आदळली.
या भीषण अपघातात श्रद्धा संतोष भानत (वय २७) हिचा जागीच मृत्यू झाला. तर तिची आई अपर्णा भानत (वय ४७) आणि बहीण ऐश्वर्या भानत (वय २६) या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचा चालक मात्र सुदैवाने बचावला.
माहितीनुसार, भानत कुटुंब शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन विरारकडे परतत असताना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!