थेरगाव : कै. नागूभाऊ गतीराम बारणे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणार्थ विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन
थेरगाव येथील कै. नागूभाऊ गतीराम बारणे यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार, १ जुलै २०२६ रोजी थेरगाव येथे विविध स्पर्धा, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,
या पुण्यस्मरणार्थ बुधवार, १ जुलै रोजी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत चित्रकला स्पर्धा आणि सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा कै. नागूभाऊ गतीराम बारणे (मुले/मुली) शाळा, थेरगाव येथे पार पडतील. त्यानंतर सकाळी १०.०० वाजता अर्धाकृती पुतळा पूजन सोहळा संपन्न होणार असून, सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत स्पर्धांमधील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंतर संतोष नगर, थेरगाव येथील एनआरबी मॅन्शन येथे सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत भजन व संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी १.०० ते ३.०० या वेळेत अन्नप्रसादाचे (महाप्रसाद) आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन समस्त बारणे, गुजर, काटे, काळभोर, पाडाळे व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले असून, नागरिकांनी आणि हितचिंतकांनी या कार्यक्रमांना उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429









