ठाण्यात झाड कोसळून एक जखमी; अनेक वाहनांचे नुकसान
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्याजवळ आज सकाळी सुमारे ८.३५ वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड अचानक कोसळल्याची घटना घडली.
या दुर्घटनेत एका व्यक्तीला दुखापत झाली असून, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळताच परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, झाड हटविण्याचे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेबाबत अधिकृत माहिती आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नसून, पुढील अपडेट्सची प्रतीक्षा आहे.
— पत्रकार सिंथिया कोरिया
Views: 56









