पुणे विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत एकसूत्रता ठेवा; विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर


पुणे विभागातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत एकसूत्रता ठेवा; विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन सादर

​पुणे: पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात एकसूत्रता ठेवण्यात यावी, अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेने केली आहे. यासोबतच विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी विभागीय स्तरावर एक बैठक तात्काळ आयोजित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन ‘महसूल कर्मचारी संघटना, पुणे विभाग’ यांच्या वतीने आज मा. विभागीय आयुक्त, पुणे यांना देण्यात आले.
​हे निवेदन संघटनेचे कार्याध्यक्ष प्रविण शिरसीकर आणि सरचिटणीस सचिन तांबोळी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आले.
​या निवेदनात कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असून, बदल्यांच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि समानता आणण्याची मागणी करण्यात आली आहे. विभागीय स्तरावरील प्रस्तावित बैठकीत कर्मचाऱ्यांच्या इतर अडचणींवर सकारात्मक मार्ग निघेल, अशी आशा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे

पत्रकार उमेश कुलकर्णी

9822548429.


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!