TET पेपरफुटी प्रकरण तापले; शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा – युवक काँग्रेस महासचिव दीपक सोनूने यांची मागणी


TET पेपरफुटी प्रकरण तापले; शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा – युवक काँग्रेस महासचिव दीपक सोनूने यांची मागणी

भोकरदन | प्रतिनिधी महेंद्र बेराड

राज्यातील TET तसेच विविध भरती परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचे महासचिव (भोकरदन–जाफ्राबाद) दीपक सोनूने यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे संबंधित शिक्षणमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दीपक सोनूने म्हणाले की, “मेहनत करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी सरकारने तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.”

या मागणीमुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून विद्यार्थ्यांमध्येही या विषयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!