फुटीर आमदार-खासदारांवर राज ठाकरेंचा घणाघात; “विकत घेणाऱ्यांपेक्षा विकले जाणारेच अधिक दोषी


फुटीर आमदार-खासदारांवर राज ठाकरेंचा घणाघात; “विकत घेणाऱ्यांपेक्षा विकले जाणारेच अधिक दोषी”

ठाणे : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारांवर जोरदार टीका केली.
राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते अत्यंत घाणेरडे आणि भयानक आहे. मूळ प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नसून स्वतःला विकून घेणाऱ्यांचा आहे. जर कोणी देहविक्रीलाच तयार असेल, तर त्यांना गिऱ्हाईक मिळतातच.”
यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षालाही सूचक इशारा दिला. महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणाचे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींचे गंभीर परिणाम भविष्यात भाजपलाही भोगावे लागू शकतात, असे त्यांनी म्हटले.
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून त्यांच्या विधानांची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!