पुण्यात राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न
चिंचवडगाव येथे राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर पालक परिचय मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याचे आयोजन ब्राह्मण महासंघ मैत्रेय बहुउद्देशीय संस्था, सोलापूर संचालित ब्रह्म वार्ता वधू-वर विवाह संस्था आणि सोबती वधू-वर केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवडगाव येथील जैन शाळेजवळ असलेल्या काशीधाम मंगल कार्यालय येथे हा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमाला वधू वराच्या पालकांनी आणि इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती.
या सोहळ्याला ब्राह्मण महासंघाचे विश्वस्त प्रवीण शिर्शीकर, पदाधिकारी उमेश कुलकर्णी, अविनाश कुलकर्णी, उदय कुलकर्णी, तसेच जिल्हा अध्यक्ष नीता जोशी, आदिती जोशी, स्मिता कुर्वे, आरती कुलकर्णी, विद्या घटवाई आणि ललिता गोरे यांनी आपली मौल्यवान उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल सर्व आयोजकांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
मेळाव्यामध्ये उपस्थित पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल वैवाहिक भविष्यासाठी आणि योग्य जोडीदार निवडीसाठी एकमेकांशी संवाद साधला. या मेळाव्याचे उत्कृष्ट संयोजन आणि नाव नोंदणीसाठी श्री. अनिल कुलकर्णी (अध्यक्ष, ब्राह्मण महासंघ शाखा सोलापूर) व त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. तसेच सौ. वैष्णवी जोगळेकर (सोबती वधू-वर केंद्र, पुणे), श्री. श्रीराम विद्द्त (ब्रह्मवार्ता वधू-वर केंद्र, परंडा) आणि सौ. मंगल केसरकर (वधू-वर संचालक, रावेत पुणे) यांनी मोलाचे योगदान दिले
आयोजकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेळावा संपल्यानंतर पुढील १० दिवसांच्या आत सहभागी झालेल्या सर्व वधू-वरांची माहिती संकलित करून त्याची एक एकत्रित पीडीएफ फाईल पालकांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर पाठवली जाणार आहे, जेणेकरून पालकांना पुढील संपर्क करणे सोपे जाईल.
पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429








