मुंबईतील मानखुर्द येथे मुसळधार पावसामुळे तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला; सहा जणांचा मृत्यू
मुंबईतील मानखुर्द परिसरात मुसळधार पावसामुळे तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल, महानगरपालिका आणि बचाव पथके युद्धपातळीवर बचावकार्य करत असून ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
पत्रकार सिंथिया कोरिया मुंबई
Views: 43






