वारकऱ्यांच्या सेवेसाठी भाजपाचा भव्य उपक्रम; आयोजन सचिन काळभोर.
पिंपरी-चिंचवड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी निगडी बस स्टॉप, मुंबई–पुणे महामार्ग, निगडी येथे वारकरी बांधवांसाठी दिवसभर भव्य सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमामध्ये दोन ट्रक केळी, २५० किलो बुंदी, चहा-नाश्ता, तसेच रेनकोट व छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय वारकरी बांधवांसाठी मोफत अन्नदान, वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक औषधांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या सेवा उपक्रमास आमदार शंकरभाऊ जगताप, अमित गोरखे, महापौर रवीभाऊ लांडगे, अनुप मोरे आणि रघुनाथ कुळकर्णी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी बांधवांची सेवा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या सेवा उपक्रमाचा सर्व वारकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सचिन काळभोर यांनी केले आहे.
पत्रकार विजय अडसूळ






