आंबोली घाटात दरड कोसळली :बेळगाव -सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत :-


आंबोली घाटात दरड कोसळली :बेळगाव -सिंधुदुर्ग वाहतूक विस्कळीत :-

बेळगाव : दी. 7 जुलै :-महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध अंबोली धबधब्याजवळ मंगळवारी मध्यरात्री मोठी दरड कोसळून प्रचंड शिळा रस्त्यावर आल्याने बेळगाव–सिंधुदुर्ग मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अचानक दरड कोसळून मोठमोठे दगड रस्त्यावर पडले. त्यामुळे मध्यरात्री काही काळ वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिस, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले दगड हटविण्याचे काम सुरू केले. बहुतांश शिळा हटविण्यात आल्या असल्या तरी काही ठिकाणी काम अद्याप सुरू आहे.”

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!