आंबेगावच्या दुग्धभेसळ प्रकरणाविरोधात मंचरमध्ये भव्य एल्गार मोर्चा:-


आंबेगावच्या दुग्धभेसळ प्रकरणाविरोधात मंचरमध्ये भव्य एल्गार मोर्चा:-

जि. पुणे, ता. आंबेगाव:दी. 7 जुलै :-आंबेगाव तालुक्याची राज्यभर बदनामी करणाऱ्या कथित दुग्धभेसळ प्रकरणाच्या निषेधार्थ मंचर येथे भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात आंबेगाव, शिरूर, जुन्नर आणि खेड तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोर्चाची सुरुवात सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथून होणार असून, धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बांगरे मार्ग (लक्ष्मी रोड) मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोर्चाचा समारोप होणार आहे.

दुग्धभेसळ प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पुढाकार घेणारे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्याचे यावेळी विशेष अभिनंदन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. दुग्धभेसळीमुळे शेतकरी, दूध उत्पादक आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याने दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.

या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, शेतकरी, युवक आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!