सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ:-


सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ:-

सांगली :दी. 7 जुलै :-सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेला सहकार विभागाने दिलेल्या स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती देत भरती प्रक्रिया पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आगामी जिल्हा बँक निवडणुकांचे कारण पुढे करत शासनाच्या सहकार विभागाने भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती. मात्र, न्यायालयाने हा निर्णय स्थगित करत भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याने भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १० जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, उमेदवारांनी या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
9359280220.


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!