भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारीपदी सरचिटणीस मधुकर बच्चे यांची नियुक्ती


भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालय प्रभारीपदी सरचिटणीस मधुकर बच्चे यांची नियुक्ती

​पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी):
भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या मध्यवर्ती कार्यालय प्रभारी पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षाचे शहर जिल्हा सरचिटणीस (महामंत्री) मधुकर बहिरू बच्चे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक शत्रुघ्न बापू काटे यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
​पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते मधुकर बच्चे यांचा सत्कार करून त्यांच्या नावाचे घोषणापत्र त्यांना सुपूर्द करण्यात आले. पक्षांतर्गत संवाद वाढवणे, कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणणे आणि संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
​या प्रसंगी पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, माजी नगरसेवक राजू दुर्गे, कार्यालय प्रमुख संजय परळीकर, तसेच मनोज ब्राह्मणकर, विशाल वाळुंजकर, अजय पाताडे, संतोष तापकीर, प्रदीप बेंद्रे, जोशना कलाटे, मनीष पंजाबी, हर्षदा मोरे, राजश्री शहा आदी उपस्थित होते.
​मध्यवर्ती कार्यालय प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल मधुकर बच्चे यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकार उमेश कुलकर्णी
9822548429


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!